सण व उत्सव
देवी मंदिरात खालील उत्सवांचे आयोजन केले जाते.
Shri Devi Utsav Invitation (2023)श्री देवी मंदिर वर्धापन दिन उत्सव
या उत्सवाचे आयोजन १९२९ साली सद्यमूर्तीची स्थापना करण्याच्या दिवसाची आठवण म्हणून केली जाते. हा उत्सव दरवर्षी माघ शुक्ल पंचमी व शुक्लषष्ठी या दोन दिवशी साजरा होतो. होम-हवनसहित नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात येते.
अश्विन नवरात्र
नवरात्रोत्सव अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अश्विन शुक्ल नवमीपर्यंत चालतो.
विजयादशमी
अश्विन शुक्ल दशमीस देवीची यथासांग पूजा होते.
श्री देवीची दैनिक पूजा सकाळी व संध्याकाळी पुरोहितांकडून केली जाते. या व्यतिरिक्त पूजा विधीअंतर्गत उल्लेख केलेल्या कोणत्याही धार्मिक विधीचे भक्त समिती व पुरोहितांना आगाऊ सूचना देऊन आयोजन करू शकतात.