सामाजिक सेवा उपक्रम
आरोग्य निधी
आपल्या स्थापनेपासून समिती सभासद व कार्यकर्ते भक्तीसाधनेबरोबरच समाजासाठी, खास करून आंदुर्ले व परिसरातील नागरिकांसाठी विकासकार्ये करण्यासाठी आग्रही होते. यासाठी आरोग्य निधी स्थापन करून त्याचा वापर आरोग्य उपकरणे तसेच आरोग्य शिबिरांसाठी केला गेला.
या निधीमध्ये मदत करण्यासाठी भक्तांनी भरघोस देणगी द्यावी व त्याचवेळी समितीला खालील माहिती द्यावी.
शैक्षणिक निधी
या निधीचा विनियोग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य विशेषतः वह्या, कंपासपेट्या, पेन, पेन्सिल इ. तसेच शाळेचा युनिफॉर्म पुरवण्यासाठी होतो.
या निधीमध्ये मदत करण्यासाठी भक्तांनी भरघोस देणगी द्यावी व त्याचवेळी समितीला खालील माहिती द्यावी.
- नाव
- पूर्ण पत्ता (पिनकोड सहित)
- भ्रमणध्वनी क्रमांक
- दूरध्वनी क्रमांक (उपलब्ध असल्यास)
- ईमेल