~~ ß SW Nnerb keÌueerb ®eecegC[e³ew efJe®®es ~~
  • cejeþer

  • English

संक्षिप्त इतिहास

आंदुर्लेस्थित श्री देवी चामुंडेश्वरी मंदिर हे मूलतः पाट व सभोवतालच्या गावांत राहणाऱ्या पाटील पाटकर कुटुंबीयांनी साधारणपणे सहाशे वर्षांपूर्वी बांधले असा विश्वास आहे. पाटील कुटुंबीय हे पाट गावाचे ग्रामाधिपती होते. साधारण १९२५ सालापर्यंत मंदिर जीर्णत्वामुळे भग्न होऊन मूर्तीला बारीक तडे गेले होते. इ.स. १९२७ ला जेव्हा कै. श्री. कृष्णाजी शिवाजी पाटकर व कै. श्री. रामचंद्र कृष्णाजी पाटकर यांनी मंदिराला भेट दिली तेव्हा ....

पुढे वाचा

भक्तनिवास

भक्तनिवास (अग्रशाळा) निर्मितीमागे मूळ उद्देश देवी दर्शनाला येणाऱ्या भक्तांना
राहण्याची व देवीसाठी नैवेद्य / प्रसाद बनविण्याची सोय व्हावी हा आहे.

अधिक माहिती

देवी भक्ती

श्री देवी चामुंडेश्वरी नम:

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||
उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु

अधिक माहिती

निधी व देणग्या

श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समिती हा सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा १८६० व मुंबई सार्वजनिक कायदा १९५० अन्वये पंजीकृत झालेला सार्वजनिक न्यास आहे.

संस्थेला देणगी द्यावयाची असल्यास श्री चामुंडेश्वरी सेवा समिती या नावाने धनादेश द्यावा द्यावा. जर देणगी समितीच्या खात्यात थेट भरावयाची असेल तर खालील माहितीची नोंद घ्यावी.

अधिक माहिती   आवाहन
  • निधी व देणग्या
  • नित्य पूजा निधी
  • नंदादीप निधी :
  • मंदिर इमारत जीर्णोद्धार निधी
  • मंदिर इमारत देखभाल निधी
  • देवी उत्सव निधी
  • भक्तनिवास बांधकाम निधी
  • नवरात्र निधी
  • इतर वस्तूंचे दान

सण व उत्सव

वर्धापन दिन

अश्विन नवरात्र

विजयादशमी

अधिक माहिती

नित्यपूजा

नोंदणीकृत नित्यपूजा यादीकरिता येथे क्लिक करा

संपर्क व इतर माहिती अद्ययावत करण्याची विनंती

श्रीदेवी चामुंडेश्वरी समितीने नित्यपूजेसाठी निधी दिलेल्या भक्तांची यादी आपल्या वेबसाईटवर (आंतरजालामधील संकेतस्थळ) उपलब्ध केलेली आहे. आपली वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यासाठी केवळ अनुक्रमांक, ज्यांच्या नावाने पूजा केली जाते त्या व्यक्तीचे नाव, जर पूजा एखाद्या व्यक्तीच्या स्मृत्यर्थ केली जात असेल, तर अशी पूजा नोंदणी करणाऱ्या भक्ताचे नाव, पूजेची तारीख व अंशतः पत्ता (जिल्हा, राज्य व पिनकोड) या यादीमध्ये वाचनासाठी उपलब्ध असून इतर माहिती समितीजवळ आहे किंवा नाही याचा केवळ उल्लेख केलेला आहे. यादी इंग्रजी भाषेमध्ये सध्या बनवलेली आहे. ज्यांनी स्वनावाने किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावाने नित्यपूजा नोंदणी केलेली आहे अशा भक्तांनी कृपया यादी वाचून खालील ईमेलवर संस्थेला कळवावे व आपले नाव व पत्ता अद्ययावत करावा.

Devichamunda2021@gmail.com

जर भक्तांनी यापूर्वी आपला दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, गोत्र आणि विपत्र (ई - मेल) समितीला कळवलेला नसेल तर कृपया ताबडतोब समितीच्या वरील ईमेलवर कळवा जेणेकरून भावी काळात समितीला संवाद साधणे व संस्थेच्या पुढाकाराने सुरुवात झालेल्या नवनवीन कार्यांची माहिती पुरवणे सुकर होईल. शक्य तर प्रत्येक भक्ताने आपले सध्याचे वास्तव्यस्थान व इतर माहिती अद्यावत करून यादीत सुधारणा करण्यास समितीला सहकार्य करावे.

जर दैववशात नित्यपूजेसाठी नोंदणी केलेल्या भक्ताचा किंवा ज्यांनी एखाद्या व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ पूजा नोंदणी केली आहे अशा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास, अशा व्यक्तींच्या नातेवाईकांनी संस्थेला त्वरित माहिती देऊन पूजा चालू ठेवावी का व चालू ठेवावयाची असल्यास पूजेची विभूती व प्रसाद कोणाकडे पाठवायचा हे कळवावे. अशा व्यक्तीचा पूर्ण पत्ता व फोनक्रमांक, ईमेल संस्थेला कळवावे.