भक्तजन दर वर्षी एखाद्या विवक्षित दिवशी स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या नावे (मुलगा/मुलगी/माता/पिता, इतर नातेवाईक किंवा मित्र) पूजा करू शकतात. त्यासाठी दिवसाची निवड ही तिथीप्रमाणे न करता रोमन दिनदर्शिकेनुसार केली जाते. दरवर्षी ठरविलेल्या दिवशी देणगीदाराच्या किंवा त्याने निर्देशिलेल्या व्यक्तीच्या नावाने पूजा करून त्याच्या पत्त्यावर विभूती व प्रसाद पाठवण्यात येतो. नित्यपूजा सुरु करण्याआधी खालील माहिती देणे आवश्यक आहे.
- देणगीदाराचे नाव
- पत्ता (पिनकोडसहित)
- पूजेची तारीख (रोमन दिनदर्शिकेनुसार) ज्या दिवशी दरवर्षी पूजा करावयाची आहे
- गोत्र
- ईमेल
- भ्रमणध्वनी क्रमांक
- दूरध्वनी क्रमांक
सध्या प्रत्येक पूजेसाठी एकदाच रु. ७५०/- भरावे लागतात. समिती वेळोवेळी या रकमेत बदल करण्याचे अधिकार राखून ठेवत आहे.
सध्या समितीकडे उपलब्ध असलेली नित्य पूजा यादी. क्लिक करा