वर्षसंख्येवर क्लिक केले असता त्यावर्षी व तदनंतर केलेले उपक्रम जाणून घेता येतील
उपक्रम
- समितीचे मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १९५० व सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६० अंतर्गत पंजीकरण
- पाटील पाटकर कुटुंबीय, जळवी कुटुंबीय तसेच निरनिराळ्या प्रांतात तसेच परदेशी स्थिरावलेल्या भक्तगणांशी संपर्क साधला.
- महाप्रसादाची सुयोग्य व्यवस्था करून दूर गावावरून येणाऱ्या भक्तगणांच्या अडचणी दूर केल्या तसेच मंदिराशी भक्तांचे भावनिक नाते निर्माण केले.
- वर्धापन दिनाची सुवर्णजयंती, नवचंडी व महाप्रसादाची व्यवस्था करून साजरी केली. या वर्षी नवचंडी व महाप्रसादाचा खर्च श्री दामोदर बी. पाटकर रा. कुर्ला यांनी उचलला.
मंदिराला भेट देणाऱ्या भक्तगणांच्या निवासस्थानाची सोय व्हावी व पूजा विधी करता यावेत यासाठी जीर्णावस्थेतील अग्रशालेचे बांधकाम व दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. अग्रशाळेत राहण्याची सोय झाल्यामुळे अधिकाधिक भक्तजन मंदिर व न्यासाशी जोडले गेले त्यामुळे न्यासाला वेळोवेळी तांत्रिक तसेच आर्थिक मदत मिळाली व न्यासाची कार्यक्षमता वाढायला हातभार लागला.
अग्रशाळेचे बांधकाम पहिल्या माळ्यापर्यंत पूर्ण करण्यात आले. या कार्यासाठी अनेक पाटील पाटकर कुटुंबियांनी आर्थिक मदत केली.त्यामधील खालील व्यक्तींचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.
- श्री. कृष्णराव उर्फ सुधा पाटकर
- श्री. अरविंद लक्ष्मण पाटील पाटकर
- श्री. प्रकाश गजानन पाटील
- श्री. बाबाजी विष्णू पाटील
- श्री. दामोदर बी. पाटकर
मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच भक्तगणांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी मंदिरासमोर एक विहीर बांधण्यात आली. ठाणे येथील निवासी वकील श्री. दामोदर अ. पाटकर यांनी या बाबतीत आर्थिक भार उचलला.
मंदिराची स्वच्छ्ता, देवीची नियमित पूजा व अर्चा तसेच येणाऱ्या भक्तगणांना पूजाविधी करता यावेत यासाठी पुरोहितांची नेमणूक करून त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली. भक्तांच्या सोयीसाठी नित्यपूजा निधी स्थापन करण्यात आला. यामुळे आपल्या इच्छेनुसार दरवर्षी एखाद्या विविक्षित दिवशी पूजा करण्याची सोय (आपल्या किंवा नातेवाईकांच्या नावे) भक्तांना उपलब्ध झाली.
मंदिर व मंदिराजवळील रस्ता या मधील मंदिराच्या जमिनीचा भाग ताब्यात घेऊन मंदिराभोवती भिंत बांधण्यात आली. यामुळे वाहने व पादचाऱ्यांची रहदारी दूर जाऊन मंदिराचे पावित्र्य राखणे शक्य झाले.
- मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. मंदिराचा पाया भक्कम करून आतील व बाहेरील खांबांचे मजबुतीकरण केले. संपूर्ण मंदिराच्या व गर्भगृहाच्या पुनर्बांधणी दरम्यान मंदिराचे सौदर्य वाढविण्यासाठी निरनिराळ्या देवता व शिवागणांच्या प्रतिमा नाजूक नक्षीकामाद्वारे निर्माण केल्या गेल्या. या कामी सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार, बांधकाम व्यावसायीक व समितीचे आधारस्तंभ श्री. अरविंद ल. पाटील पाटकर यांनी पुढाकार घेतला व मंदिराला अप्रतिम असे देखणे रूप दिले.
- मंदिराच्या नूतनीकरणाचा भाग म्हणून घुमट मजबूत करण्यात आला व त्यावर वेगवेगळ्या आकर्षक नक्षी/प्रतिमा कोरण्यात आल्या.
मंदिराचे छत दुहेरी होते व त्याच्या बांधणीत मंगलोरी कौले व लाकूड सामानाचा वापर झाला होता. भक्तांच्या आग्रहामुळे व भावनिक/उपासनेशी निगडित गरजा लक्षात घेऊन मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूला श्री गणपती व श्री कुळपुरुषाचे मंदिर स्थापन करण्यात आले. मंदिरामध्ये ग्रेनाइट बसवून दरवाजे व खिडक्या नव्याने बसविल्या गेल्या.
मंदिराच्या सभोवताली प्रांगणात नवीन लादी (टाइल्स) बसवून मंदिराचे सुशोभीकरण तसेच भक्तांची बसण्याची सोय करण्यात आली. मंदिराच्या कंपाउंडच्या आतून फुलझाडांची लागवड करून देवीसाठी नियमित फुले मिळण्याची सोय झाली. या कामी वाशी, नवी मुंबई येथील वास्तुरचनाकार व बांधकाम व्यावसायिक श्री सुरेश पाटकर यांनी आर्थिक भार उचलून भक्तगणांची सोय केली.
अग्रशाळेशेजारी नाट्यगृह बांधण्यात आले. त्यामुळे स्थानिक कलाकार तसेच भक्तगणांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले तसेच देवीचरणी भजन/कीर्तन तसेच संगीत नाट्यकला सादर करणाऱ्या कलाकार भक्तांची सोय झाली. देवी मंदिरासमोर विहिरीच्या बाजूच्या जागेवर उत्सवाला व देवीदर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी वाहनतळ बनविला गेला. तसेच परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी फुलझाडे व इतर वृक्षांची लागवड करून बगीचा निर्माण केला.
अग्रशाळेवर आणखी एक मजला बांधून भक्तांच्या निवासासाठी सोय वाढवण्यात आली. तसेच नाट्यगृहावर छप्पर बांधून कलाकारांची गैरसोय दूर केली गेली.
अश्विन महिन्यातील नवरात्र व विजयादशमी या काळात उत्सव करण्याची नवीन प्रथा चालू करून समितीने भक्तांची इच्छापूर्ती केली.
मंदिराच्या अग्रशाळेजवळ सौर उर्जा निर्मितीसाठी संयंत्र बसवून समितीने प्रदूषणविरहित उर्जा निर्मिती केलीच पण वीजबिलाचा खर्चही वाचविला.
वरील उपक्रमांचा उल्लेख भक्तगणांनी दिलेली माहिती व समितीजवळील कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेला आहे. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास व इतर माहिती द्यावयाची असेल तर भक्तगणांनी समितीशी लेखी संपर्क साधावा.
श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समिती
नोंदणी:
सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट१८६० अंतर्गत BOM/210/79 GBBSD
दि. १९ एप्रिल १९७९
मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा १९५० अंतर्गत
क्र. एफ—५४४६ दि. ७ जून १९७९
सध्याचा पत्ता:
c/o प्रकाश गजानन पाटील
इ/२ व सी/५, सह्यगिरी सहकारी गृह संस्था
सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व),
मुंबई- ४०००६३. महाराष्ट्र
समितीचे सद्यकालीन कार्याकालीन मंडळ :
- श्री. सतीश दत्तात्रेय पाटील, अध्यक्ष
- श्री. महेंद्र दामोदर पाटकर, कार्याध्यक्ष
- श्रीमती अमिता हेमंत पाटील, उपाध्यक्ष
- श्री. प्रकाश गजानन पाटील, चिटणीस
- श्री. नंदकिशोर भालचंद्र पाटील, सहचिटणीस
- श्री. संजय बाळकृष्ण पाटील, खजिनदार
सन्माननीय सदस्य :
- श्री प्रभाकर हरिश्चंद्र पाटील
- श्री. शैलेंद्र भालचंद्र पाटील
- श्रीमती वर्षा विजय पाटकर
- डॉ. शोभा विजय पाटकर
- श्री. चंद्रशेखर म. पाटकर
- श्रीमती सुचेता सुभाष पाटील
- श्री. नचिकेत दीपक पाटकर
पुरोहित:
श्री. हरिश्चंद्र (आबा) शामराव पाटील
दूरध्वनी: ०२३६२ – २३३०८० / ०२३३१०६
भ्रमणध्वनी: ९४२३५११५३४
स्थानिक सल्लागार उपसमिती
श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समितीच्या निर्मितीनंतर काही काळाने मंदिराचे दैनंदिन व्यवस्थापन, पुरोहितांना मार्गदर्शन व देवीची निरंतर अखंड सेवा चालू रहावी यासाठी एक समितीचे गट अथवा संस्था निर्माण करण्याची गरज वाटू लागली. श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समितीचे बहुसंख्य सदस्य मुंबई येथे राहत असल्याकारणाने त्यांना मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी वारंवार आंदुर्ले येथे जाणे जिकीरीचे होते.
यासाठी विचारविनिमय होऊन आंदुर्ले गावचे सरपंच, प्रमुख नागरिक व इतर मान्यवरांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे उपसमिती स्थापन करण्याची परवानगी मागितली. दि. २८ ऑगस्ट १९८८ रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे अर्ज करण्यात आला व खात्याने आज्ञापत्र क्र. २५०७/८८ दि. ५ डिसेंबर १९८८ रोजी स्थानिक सल्लागार उपसमिती स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली.
सदर उपसमिती मंदिराची दैनंदिन पूजा-अर्चा, धार्मिक कार्ये, मंदिर व भक्तनिवासाची देखभाल, भक्तांसाठी न्याहारी इ. कार्यात पुरोहितांना मदत व मार्गदर्शन करते.
स्थानिक सल्लागार उपसमितीचा पत्ता पुढीलप्रमाणे :
श्री देवी चामुंडेश्वरी स्थानिक सल्लागार उपसमिती
c/o श्री हरिश्चंद्र (आबा) शामराव पाटील (पुरोहित)
श्री देवी चामुंडेश्वरी भक्तनिवास,
आंदुर्ले, तालुका कुडाळ,
जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र – ४१६५२०
श्री देवी चामुंडेश्वरीच्या वार्षिक उत्सवाचे आयोजन स्थानिक सल्लागार उपसमिती करते. समितीचे सभासद व स्थानिक कार्यकर्ते या कमी अथक परिश्रम करतात.
उपसमितीच्या सुरुवातीच्या काळात अनेक वर्षे एक जाणते सभासद व कार्यकर्ते श्री लक्ष्मण शांताराम पाटील यांनी उत्सव व महाप्रसादाची घडी बसविण्यासाठी स्थानिक नागरिकांना हाताशी धरून अपर मेहनत घेतली. त्यान्ह्या नियोजनामुळे उत्सवामध्ये सुसूत्रता येण्यास मदत झाली.
तद्नंतर समितीचे कार्य नवीन पिढीतील कार्यकर्त्यांनी जोमाने चालू ठेवले आहे.
सर्वात पहिली स्थानिक सल्लागार उपसमिती
अध्यक्ष
श्री सखाराम कृष्णाजी पाटकर
उपाध्यक्ष
श्री सदानंद लक्ष्मण पाटील,
कार्यकारी अध्यक्ष
श्री. सीताराम रामचंद्र पाटकर
सभासद :
- श्री लक्ष्मण शांताराम पाटील
- श्री मोहन आप्पाजी तांडेल
- श्री सीताराम नारायण पाटील
- श्री नरसिंह बाळकृष्ण पाटील
- श्री प्रमोद गजानन पाटील
- श्री ज्ञानेश्वर हनुमंत पाटील
- श्री अनिल श्रीकृष्ण प्रभू
- श्री सत्यवान जगन्नाथ माडये
- श्री भिवा राजाराम केळूसकर
वार्षिक अहवाल २०२१-२०२२
वार्षिक अहवालातील माहितीसंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण / सूचना करावयाची असल्यास वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सचिवांना १५ दिवस अगोदर सूचित करून सादर करता येईल.
अधिक अहवाल माहिती