~~ ß SW Nnerb keÌueerb ®eecegC[e³ew efJe®®es ~~
  • cejeþer

  • English

आवाहन

श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समितीने स्थापनेपासून मंदिराचे नूतनीकरण, देवीची दैनंदिन पूजाअर्चा, उत्सव व्यवस्थापन, भक्तांसाठी निवासव्यवस्था व भोजन/जलपान इत्यादी सुविधायाकार्यांसाठी अथक प्रयत्न केले व भक्तांनी सतत आर्थिक व मनुष्यबळ पुरवून समितीला पाठिंबा दिला.

भक्तांच्या इच्छेनुसार समितीने श्रीगणपती व कुलपुरुष मंदिरनिर्मितीबरोबर नित्यपूजा, नंदादीप, वर्धापनदिनउत्सव

व नवरात्रोत्सव इत्यादी धार्मिक कार्यासंबंधी निधी निर्माण केले. श्रीदेवीच्या मंदिराच्या व प्रांगणाच्या देखभालीसाठी निधी उभारला.

आजपर्यंत समिती वर्धापनदिन उत्सवात होणाऱ्या नवचंडी व महाप्रसाद ही शुभकार्ये प्रमुख दानशूर भक्तगणांच्या साहाय्याने पार पाडत असे. दरवर्षी वाढणारी भक्तसंख्या व महागाई लक्षात घेता मंदिर जीर्णोद्धार व भक्तनिवास बांधणीसारखाच उत्सवासाठीदेखील भरीव निधी उभारणे अत्यावश्यक आहे. सध्या उत्सवनिधीसाठीच्या ठेवी केवळ रु.१०लाख आहेत. सध्यस्थितीत पूर्ण वर्धापनदिन उत्सवाचा खर्च साधारणतः रुपये पाच ते सहा लाखापर्यंत येतो.

बँकांचे कमी होणारे व्याजदर व त्यामुळे संस्थेचे रोडावणारे व्याज उत्पन्न हे लक्षात घेता उत्सवनिधीत साधारणतः एक कोटी पन्नास लाख रुपये जमले की समिती दरवर्षी केवळ दात्यांवर अवलंबून न राहता व्याजातून मिळालेल्या धनातून उत्सवाचा खर्च करू शकेल.

आपली कुलदेवता व इष्टदेवता असलेल्या श्री देवी चामुंडेश्वरीचे देवस्थान आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे यासाठी भक्तांनी उत्सवनिधीमध्ये आपापल्या परीने, स्वेच्छेने व श्री देवी कृपेने प्राप्त झालेल्या शक्तीनुसार देणगी देऊन समितीला आर्थिक बळ पुरवावे अशी आमची कळकळीची विनंती आहे.

तुमच्या प्रेमातून विकसित झाल्येल्या या संस्थेची प्रगतीही आपल्या येणाऱ्या पिढीला तसेच आजवर देवीमंदिराशी संलग्न न झाल्येला भक्तगणांना कुलदेवतेकडे आकर्षित करून भक्तीविषयक आवड निर्माण करण्यासाठी, देवीकृपेने उन्नतीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल.

आपणास विदित आहेच की संस्था आपल्या वार्षिक अहवालात रुपये पाच हजार व अधिक रकमेच्या देणग्यांचा विशेष उल्लेख करते. आपण आपला धनादेश श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समिती या नावाने काढून समितीच्या मुंबई कार्यालयात किंवा आंदुर्ले येथे मंदिरात पुरोहिताकडे पाठवू शकता, अथवा RTGS वा NEFT चा वापर करून समितीच्या खालील बँक खात्यामध्ये रकमेचा भरणा करू शकता.

  • सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड खाते क्रमांक 0२८२00१0000९८९३ IFSC कोड SRCB00000२८ अथवा
  • स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक ३०२९९४६१४३४ IFSC कोड SBIN000१९७५.

कृपया रकमेचा भरणा केल्यावर समितीच्या अधिकृत इमेलवर shridevichamundeshwari@gmail.com आपले नाव, पूर्ण पत्ता, पाठवलेली रकम, व्यवहाराचा क्रमांक, देणगीची तारीख, भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ज्या बँकेतून रकम पाठवली त्या बँकेचे व शाखेचे नाव आणि देणगीचा उद्देश ही सर्व माहिती समितीला कळवावी जेणेकरून आपल्याला पावती पाठविणे शक्य होईल.