भक्तनिवास / अग्रशाळा
भक्तनिवास (अग्रशाळा) निर्मितीमागे मूळ उद्देश देवी दर्शनाला येणाऱ्या भक्तांना राहण्याची व देवीसाठी नैवेद्य / प्रसाद बनविण्याची सोय व्हावी हा आहे. दूर अंतरावरून मंदिरात येणाऱ्या भक्तांना स्वत:चे वास्तव्यस्थान जवळ नसल्यास पूजा विधी करण्यास व अन्नपाणी मिळण्यास अडचणी येत होत्या. समितीच्या सदस्यांच्या या गोष्टी निदर्शनास आल्या.
तद्नंतर समितीने अग्रशाळेच्या (भक्तनिवास) बांधकामास प्राधान्य देऊन भक्तांची सोय केलीच, पण वेळोवेळी भक्तनिवासाचा विस्तार करून त्यात आधुनिक सोयी पुरविल्या. भक्तनिवास मंदिराच्या मागील बाजूस स्थित असून त्यांत राहण्याबरोबर चहा व जेवणाचीही सोय केली जाते. भक्त निवासात राहावयाच्या शर्ती व नियम खालीलप्रमाणे आहेत. भक्तनिवास व त्यांतील सोयीची छायाचित्रे ही आपल्याला खालीलप्रमाणे उपलब्ध केली आहेत.
शुल्क | मोठी खोली | मध्यम खोली |
---|---|---|
वातानुकुलीत | रु. १२००/- प्रति दिवस | रु. ८००/- प्रति दिवस |
सामान्य | रु. ६००/- प्रति दिवस | रु. ३००/- प्रति दिवस |
भक्तनिवासात राहण्यासाठी नियम:
- भक्तनिवास हा मंदिराचाच एक भाग आहे. यामुळे भक्तजनांनी वास्तूचे पावित्र्य जपणे महत्वाचे आहे.
- समिती व पुरोहित / पदाधिकारी यांना वास्तूमध्ये प्रवेश देण्याअगोदर आवश्यक माहिती विचारण्याचा व गरज वाटल्यास चौकशी करण्याचा अधिकार आहे.
- सर्व भक्तांना कळकळीची विनंती आहे की निवासाची / जेवणाची उपलब्धता पुरोहितांशी संपर्क साधून येण्याअगोदरच जाणून घ्यावी आणि आपले नाव नोंदवावे.
- भक्तनिवासाचा वापर करताना काही अडचणी आल्यास पुरोहितांशी संपर्क साधावा.
- आपल्या सूचना / तक्रारी / मते व नोंदी पुरोहितांकडे उपलब्ध असलेल्या नोंदवहीत लिहून ठेवाव्यात.
- उपरिनिर्दिष्ट शुल्काची खातरजमा येण्याआधीच पुरोहितांकडून करून घ्यावी.
- भक्तनिवास हा भक्तांची तात्पुरती सोय करण्याच्या उद्देशाने बांधला आहे. त्यातील सोयी सुविधांची व्यापारी तत्वावर चालणाऱ्या निवासी सोयींशी तुलना करू नये.
- आपल्या निवासात आपल्या वस्तूंची काळजी स्वत: घ्यावी.
- मंदिर व भक्तनिवासात धूम्रपान / मदिरापान किंवा कोणत्याही अंमली किंवा तत्सम पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे.
समिती वर्धापनदिन तसेच नवरात्र उत्सव दरम्यान भक्तनिवासामधील खोल्यांसाठी आरक्षण स्वीकारत नाही. या काळात शक्यतो जास्तीत जास्त भक्त व त्यांचे कुटुंबियांची सोय करण्यासाठी हॉल व भक्तनिवासामधील खोल्यांची उपलब्धता ठरविण्याचे अधिकार समितीकडे राखून ठेवण्यात येत आहेत. अशावेळेस समयोचित भान ठेवून समितीस सहकार्य करावे, ही विनंती.