~~ ß SW Nnerb keÌueerb ®eecegC[e³ew efJe®®es ~~
  • cejeþer

  • English

श्री चामुंडेश्वरी चरणी होणारे पूजा विधी

विधीचे नाव शुल्क (रुपये)
अभिषेक To be updated
एकादशमी To be updated
पंचामृत पूजा To be updated
कुंकुमार्चन To be updated
देवी सहस्त्रनामावली (अक्षत पूजा) To be updated
देवी नैवेद्य To be updated
नवचंडी To be updated

वरील विधी मंदिरातील समितीने नेमलेले पुरोहित करतील व आवश्यक असल्यास पुरोहित यजमान भक्तांशी आधी संपर्क साधून त्यांच्या परवानगीने अधिक ब्राह्मणांची सोय करतील.

देवी मंदिराच्या वर्धापनदिनी जर एखाद्या भक्ताला नवचंडी यज्ञ करावयाचा असेल किंवा इतर कोणत्याही दिवशी नवचंडी करावयाची असेल तर कृपया पुरोहितांशी वा समितीशी संपर्क साधावा.

महत्वाची सूचना

समितीने श्री देवीच्या भव्य अशा मुख्य मूर्तीसमोर एक छोटी मूर्ती स्थापन केली आहे. या मूर्तीची दैनदिन पूजा व इतर विधीदरम्यान पूजा केली जाते. सर्व भक्तगणांना नम्र विनंती आहे की त्यांनी देवीच्या मूळ भव्य मूर्तीला स्पर्श करणे टाळावे, जेणे करून मूर्तीचे पावित्र्य राखले जाऊन ती सुरक्षित राहील. मूर्तीच्या अंगावर फुले, हळद, कुंकू, चंदन किंवा इतर पूजा साहित्याचा किंवा हारामधील कठीण भागाचा विपरीत परिणाम होऊ नये हा यामागचा नम्र उद्देश आहे.

श्री गणेश पूजा विधी

खालील विशद केलेले पूजा विधी श्री गणेशचरणी केले जातात.

विधीचे नाव शुल्क (रुपये)
अभिषेक To be updated
एकादशमी To be updated
पंचामृत पूजा To be updated
सहस्त्रावर्तन To be updated
गणेश याग To be updated

कुलपुरुष पूजा विधी

कुलपुरुषाच्या चरणांची प्रतिकृती असलेला शुभ्र चौथरा हे पाटील पाटकर घराण्याच्या मूळ पुरुषाचे प्रतिक आहे.

विधीचे नाव शुल्क (रुपये)
पवमान अभिषेक To be updated
रुद्र अभिषेक To be updated
पुरुष सूक्त अभिषेक To be updated
लघु रुद्र To be updated
रुद्र एकादशमी To be updated

वरील शुल्कामध्ये फेरफार करण्याचे अधिकार स्थानिक सल्लागार समिती राखून ठेवत आहे. सर्व भक्तजनांना विनंती आहे की पुरोहितांशी संपर्क साधून शुल्कासंबंधी खात्री करून घ्यावी. तसेच नवचंडी/सप्तशती पूजा यासंबंधी खर्चाचा अंदाज पुरोहितांकडून घ्यावा.

वरील विधीव्यतिरिक्त इतर कोणतेही विधी मंदिरात केले जात नाहीत.

जर एखाद्या भक्ताला देवीला साडी किंवा इतर प्रकारचे किंमती वस्त्र अर्पण करावयाचे असेल तर देवीस वाहून झाल्यावर ती साडी वा वस्त्र पुरोहित वा स्थानिक समितीच्या पदाधिकाऱ्यांना देऊन त्याची पावती करून घ्यावी.